मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये येणाऱ्या काळात अनेक प्रदेशक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील असा दावा केला होता. यानंतर विरोधकांनी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना कोंग्रेसमध्ये विलन होणार, असा दावा केला जात आहे. तर शरद पवारांच्या या भाकितामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालीय. आता शरद पवार यांनी सरसकट पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत असा मोठा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासाठी शरद पवार आग्रही होते, भाजपसोबत ६ वेळा बैठकाही झाल्या होत्या, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. अजित पवार यांच्या या दाव्यानंतर आता स्वतः शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच २०२४ लोकसभेनंतर सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत, असं त्यांनी म्हंटल आहे.

तर शरद पवार बोलताना म्हणाले, “काँग्रेस विचारधारेच्या जवळ जाणारे काही पक्ष आहेत. उदाहरणार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा एक आहे. दोन्ही पक्ष स्थापन झाल्यापासून एकत्र काम करत आहेत. एकत्र काम आणि एक विचारधारा यामुळे अधिक एकत्र काम करावं अशी माझी भावना आहे. मात्र सरसकट प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत,” असे शरद पवार म्हणालेत.

तसेच यावेळी बोलताना अजित पवार यांच्या दाव्यावरही शरद पवारांनी प्रत्यूत्तर दिले. काहीही झालं तरी “आम्ही गांधी नेहरुंचा विचार सोडणार नाही. आमच्यातील काही सहकारी भाजपसोबत जाण्याच्या विचाराचे होते. मी सहकाऱ्यांना सांगितलेलं चर्चा करायची तर तुम्ही करा. मात्र सोबत जाण्याचा निर्णय पक्षाचा नव्हता, असे ते म्हणाले. तसेच शिवसेना ही स्वतंत्र संघटना आहे. त्यांचे अस्तित्व स्वतंत्र आहे,” असेही महत्वाचे विधान त्यांनी केले.