कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझ्यावर बिनबुडाचे आरोप होणार, हे मला माहीत होते. किरीट सोमय्या यांनी माझ्यावर १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोप केले आहेत. याचा मी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो. सोमय्यांना काहीही माहिती नाही. त्यांनी कागल, कोल्हापुरात येऊन माहिती घ्यावी, असे प्रतिआव्हान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांना आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या परिवाराने सुमारे १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केला. या आरोपांना मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की,
सोमय्यांवर १०० कोटींची अब्रु नुकसानीचा फौजदारी दावा करणार…
सोमय्यांवर सीए पदवीवर शंका….
भाजप कोल्हापुरात सपाट झालं…
चंद्रकांत दादांना कोल्हापुरात स्थान नाही…
रस्ते घोटाळ्याबाबत चंद्रकांतदादांवर तक्रार करणार…