मुंबई (प्रातिनिधी) : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४२  आमदारांनी शिवसेनेतून बंड पुकारून वेगळा गट स्थापन केला; परंतु  आमदारांना बळजबरीने सूरत आणि गुवाहाटीला नेल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, नितीन देशमुख यांचे आरोप खोटे असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.

शिंदे गटातून निसटलेल्या आमदार कैलास पाटील आणि आमदार नितीन देशमुख यांना आज शिवसेनेने मीडियासमोर आणले. यावेळी आपल्याला फसवून सूरतला नेण्याच आल्याचा आरोप करत आमदार कैलास पाटील यांनी आपल्या सुटकेचा थरार मीडियाला सांगितला.

आमदार नितीन देशमुखांचा यांनी मी स्वतःची सुटका करून पळून आल्याचा केलेला हा दावा खोटा  असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. नितीन देशमुख यांचा गुवाहाटी ते अकोला हा परतीचा प्रवास खासगी विमानाने झाला. एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी सन्मानाने त्यांना अकोल्याला पोहोचवले त्याचे पुरावे म्हणून फोटो त्यांनी सादर केले. त्यामुळे नक्की खरं कोण बोलतंय असा सवाल उपस्थित होत आहे.