पुणे : महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे विकसीत, सुरक्षित आणि पर्यावरणपुरक असे संकल्पपत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय जनता पक्षाचं व्हिजन मांडणारं हे संकल्पपत्र आहे. तसेच पुणेकरांनी सुचविलेल्या सूचनांचा अंतर्भाव असलेलं हे संकल्पपत्र आहे.

या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहून संकल्पपत्रातील सर्व संकल्प मुरलीधर मोहोळ निश्चित पूर्ण करून पुण्याला नवा आयाम मिळवून देतील असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

उच्च प्रतीच्या पायाभूत सुविधा विकसित करणं, उद्योग आणि रोजगारवृद्धीसाठी प्रयत्न करणं, शाश्वत विकासाचं धोरण राबविणं, भविष्याचं आव्हान पेलणारं शहर बनविणं, सांस्कृतिक पुण्याची ओळख आणखी बळकट करणं आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीही नियोजन करणं… या साऱ्याच बाबी या संकल्पपत्रात अंतर्भूत आहेत.  

या प्रकाशनावेळी खा. मेधाताई कुलकर्णी, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार आशिषजी देशमुख, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपकभाऊ मानकर, मनसेचे नेते बाबु वागस्कर, शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनावणे, लहुजी क्रांती सेनेचे नितीन वायदंडे, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर उपस्थित होते.