कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त निखिल मोरे आणि सहायक आयुक्त संदिप घार्गे यांनी प्लाझ्मादान करुन कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांसमोर नवा आदर्श निर्माण केला.

उपायुक्त निखिल मोरे आणि सहायक आयुक्त संदिप घार्गे यांनी येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात जाऊन आपले प्लाझ्मादान केले. या उपक्रमाबद्दल महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कौतुक केले. रक्तदानाइतकेच प्लाझ्मादानही श्रेष्ठदान असल्याने कोल्हापूर शहर व जिल्हयातून कोरोनामुक्त झालेल्या तसेच होणाऱ्या नागरिकांनी प्लाझ्मा दान करुन गरजू तसेच अत्यवस्थ रुग्णांना जीवदान द्यावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.