कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्यावतीने यंदाच्या दिवाळीची सुरुवात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रक्तदान शिबिराने करण्यात आली.कोल्हापूर महानगरपालिका रक्तपेढीच्यावतीने क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर हॉलमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती महापौर निलोफर आजरेकर आणि स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांची होती. कार्यक्रमाला गटनेते शारंगधर देशमुख, अजित ठाणेकर, माजी महापौर हसिना फरास, अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, उप-आयुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त संदिप घार्गे, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांच्यासह अनेक मान्यवर तसेच अधिकारी आणि कर्मचारी उप‍‍स्थित होते. यामध्ये महापालिकेचे स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते शारंगधर देशमुख यांनीही रक्तदान करुन इतरांसमोर रक्तदानाचा आदर्श ठेवला. या रक्तदान शिबिरात शहरातील पत्रकारांनीही सहभाग घेतला.

याबरोबरच आजच्या रक्तदान शिबिरात महापालिकेच्या ५० वर्षावरील ५ जणांनी रक्तदान करुन अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर एक उदाहरण निर्माण केले. यामध्ये राजाराम उलपे या ५२ वर्षाच्या कर्मचाऱ्यांने आज पहिल्यांदाच रक्तदान केले, तसेच राजेंद्र मगदूम (वय ५३), विलास साळोखे (वय ५१), संजय भोसले (वय ५१), तसेच विजय कुंभार (वय ५४), यांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाला नगररचना सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संजना बागडी, रक्तपेढी अधिकारी सुरेंद्र शेलार, उपशहर अभियंता बाबुराव दबडे, हर्षदीप घाडगे, मुख्य आरोग्‍य निरिक्षक जयवंत पोवार , वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने, एलबीटीचे श्री. साळोखे, आसपाक आजरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आजच रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात रक्तपेढीचे डॉ. मनिष पाटील यांच्यासह कर्मचारी जस्मीन काझी, धनंजय गुरव, प्रतिभा धनवडे, स्वाती शेलार यांचे बहुमोल सहकार्य लाभले.