कोल्हापूर ( प्रतिनिधी ) धनंजय महाडिकांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वरिष्टांकडून आदेश आल्यास शौमिका महाडिक हातकणंगले लोकसभा मतदार संघ निवडणूक लढवतील असं विधान केलं आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचं वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होणार यावर पुढील घडामोडी अवलंबून असल्यांच ते म्हणाले.

पुढे बोलताना खासदार महाडिक म्हणाले, शौमिका महाडिक यांना जर केंद्रीय नेतृत्वाकडून आदेश आला तर हातकणंगलेमधून लढण्याची महाडिक परिवाराची तयारी आहे.” या भुमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीच्या संधीसाठी विद्यमान खासदार धैर्यशिल माने यांचे सुरु असलेले प्रयत्न फळाला येणार का ? याचा ही निकाल यामध्ये लागणार आहे. त्यामुळे सध्या चर्चा शौमिका महाडिकांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु असली तरी यात निकाल विद्यमान खासदारांचा ही लागणार असल्याचं स्पष्ट आहे.

प्रकाश आंबेडकरांनी महायुतीलाही पाठींबा द्यावा

महाराष्ट्रात वंचित बहूजन आघाडीची ताकद आहे हे नाकरता येणार नाही. मात्र MVA ने त्यांना जो फॉर्मुला दिला तो त्यांना मान्य आहे असं वाटतं नाही. प्रकाश आंबेडकर यांचा एकला चलो चा नारा दिला आहे तर काही ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. महायुतीला सुद्धा त्यांनी पाठिंबा द्यावा असे प्रयत्न करायला काही हरकत नाही. असं खासदार महाडिकांनी म्हटलं आहे.