कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहामधील कर्मचाऱ्यांना एका बराकीच्या शौचालयात मोबाईल हँडसेट मिळून आला. या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्यावतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

आज सायंकाळी कळंबा कारागृहातील एका बराकमधील शौचालयात, कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांना एक मोबाईल हँडसेट मिळून आला. याप्रकरणी एका कैद्याकडे कर्मचाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. कारागृह प्रशासनाच्यावतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

या कारागृहामध्ये काल टेनिस बॉलमधून गांजा टाकणाऱ्या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली असतानाच आज या कारागृहात मोबाईल हँडसेट मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.