सांगली: राज्यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अनेक लक्षवेधी निवडणुका होत आहेत. त्यापैकी सांगली लोकसभेच्या हायव्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत असताना आता सर्वपक्षीय नगरसेवकांनी पक्षाचा दबाव जुगारून विशाल पाटलांना पाठींबा देत प्रचारात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली असून राज्याच्या राजकारणात मिरज पॅटर्नची चर्चा चांगलीच रंगली आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात मिरज पॅटर्नची चांगलीच चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी सांगलीतील सर्वपक्षीय नगरसेवक एकटवताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील नगरसेवकांनी विशाल पाटील यांना जाहीरपणे पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. हे पाऊल उचलताना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट अशा सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पक्षीय कारवाईला न झुगारुन उघड विशाल पाटील यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार संजय पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांची धाकधूक वाढली आहे.
राज्यात मिरज पॅटर्नची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि आरपीआयच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन नवा पायंडा पडून सांगली लोकसभेच्या निवडणुकीत विशाल पाटील यांना बळ दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा हा मिरज पॅटर्न ठरेल. तर सर्व नगरसेवकांनी एकत्र येत विशाल पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. जयंत पाटील यांचे खंदे समर्थक असणारे नगरसेवकही या पॅटर्नमध्ये सहभागी झाले आहेत. भाजप पक्षाच्याही अनेक नगरसेवकांनी ही संजय काका पाटील यांना विरोध करत विशाल पाटील यांचा प्रचार करत आहेत. पक्षाच्या कारवाईला न जुमानता विशाल पाटील यांचा प्रचार करणार असल्याची ठाम भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे आता भाजप, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सांगली लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, ही जागा काँग्रेसची असल्याचे सांगत विशाल पाटील यांनी याठिकाणी शड्डू ठोकला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी मनधरणी करुनही विशाल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माघार घेतली नाही. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता सांगलीत विशाल पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील विरुद्ध भाजपचे संजयकाका पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये विशाल पाटील यांना मिळणारा पाठिंबा वाढताना दिसत आहे.

या नगरसेवकांचा विशाल पाटलांना पाठिंबा?

  • शिवाजी दुर्वे- भाजप
  • आनंदा देवमाने- भाजपा
  • निरंजन औटी- भाजप
  • संदीप औटी- भाजप
  • मैन्युदीन बागवान- राष्ट्रवादी, शरद पवार गट, माजी महापौर
  • अझम काझी- राष्ट्रवादी
  • चंद्रकांत हुळवान- राष्ट्रवादी
  • नरगीस सय्यद- राष्ट्रवादी
  • संजय मेंढे- काँग्रेस
  • बबीता मेंढे- काँग्रेस
  • करन जामदार- काँग्रेस
  • वहिदा नायकवाडी- काँग्रेस