कोल्‍हापूर ( प्रतिनिधी ) महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शतचंडी होम व महाप्रसादाचे आयोजन केले होते. याचे औचित्य साधून फर्टीमीन व फर्टीमीन प्लस या उत्पादनांचा 5 किलो पॅकिंगमधील विक्री शुभारंभ व पशुखाद्य मागणी मोबाईल ॲपचे उद्घाटन माजी गृह राज्‍यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडले.


या उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील म्हणाले कि, गोकुळ दूध संघ नेहमीच दूध उत्पादकांच्या हितासाठी प्रयत्नशील असून पशुखाद्य हा दुग्ध व्यवसायाचा पाया असल्याने सकस व गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देणेसाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे. म्हणूनच जिल्ह्यात सुमारे 90 ते 95 % लोक गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य वापरतात. गोकुळ हा दूध उत्पादकांचा संघ आहे. या भावनेतून सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका घेत आहोत.


यावेळी बोलताना गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, फर्टीमीन व फर्टीमीन प्लस 5 किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध व्हावे अशी मागणी संपर्क सभे मधून आल्याने त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन फर्टीमीन व फर्टीमीन प्लस 5 किलो पॅकिंगमध्ये उपलब्ध करून दिले आहे.


यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक, बाबासाहेब चौगले, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर,नंदकुमार ढेंगे, अमरसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, आर.के.मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व्यवस्थापक डॉ.व्ही.डी.पाटील संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.