( दिंडनेर्ली प्रतिनिधी कुमार मेटील ) नंदगाव ता. करवीर येथील हर हर महादेव दूध संस्था व शिवपार्वती महिला सह दूध संस्था मर्यादित नंदगाव नुतन वास्तुचा उद्घाटन सोहळा व शेतकरी मेळावा पार पडला. मा विधान परिषद आमदार सतेज पाटील यांच्या शुभहस्ते उद्धघाटन पार पडले.

यावेळी भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभासदांनी व संस्थांनी म्हैस दूध वाढीसाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. असे सतेज पाटील यांनी मेळाव्यात आवाहन केले.

गोकुळ संचालक विश्वास नारायण पाटील यांनी कुस्ती क्षेत्राला चालना मिळण्यासाठी कुस्ती मैदानांसाठी गोकूळ दूध संघामार्फत दिले जाणार अनुदान बंद झालेल आहे. ते पुन्हा सुरू करण्याची ग्वाही दिली. तसेच हरहर महादेव दूध संस्थेने कमी कालावधीत केलेली प्रगती अतिशय उल्लेखनीय आहे इतर दूध संस्थांनी या संस्थेचा आदर्श घ्यावा. असे आपल्या मनोगतात सांगितले. याबद्ल त्यांनी संस्थापक शाबाजी कुराडे यांचे कौतुक केले.

यावेळी गोकूळ चे संचालक शशीकांत पाटील चुयेकर , प्रकाश पाटील , बाबासो चौगले , बयाजी शेळके . बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर. सनी नरके. विश्वासराव दिंडोर्ले. दिगंबर पाटील. श्रीपती पाटील. शांतिनाथ बोटे. संग्राम नरके. शाहूचे संचालक संजय नरके तसेच मोठ्या प्रमाणात परिसरातील दूध उत्पादक महिला व शेतकरी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.