मुंबई ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकास भारत संकल्प यात्रेअंतर्गत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मोदी यांनी विविध योजनांचे लोकार्पण केले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या सोहळ्यास ऑनलाईन उपस्थित राहिले.


जन औषधी योजना, लखपती दीदी योजना यांसारख्या अभिनव योजनांमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असा ठाम विश्वास वाटत असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. कल्याणकारी योजना राबवून जनहित साधणाऱ्या मोदीजींचे पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.


देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा निर्णय देखील नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. चांगले औषध आणखी स्वस्त औषध हीच सर्वात मोठी सेवा असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी धोरणे खासदारांनी पोस्टर लावण्यासाठी नसून मोदींच्या हमीचा सर्वांना फायदा झाला पाहिजे, असे देखील मोदींनी स्पष्ट केले.