पुणे ( प्रतिनिधी ) नवरात्रौत्सव म्हणजे आदीशक्तीचा जागर तसेच आनंद, मांगल्य आणि उत्साहाचा सण. नऊ दिवस प्रत्येक घराघरात देवीची उपासना करून हा सण संपूर्ण राज्यात साजरा केला जातो. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊ इच्छिणाऱ्या दुर्गांच्या पंखांना बळ देण्याचा, त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प करू, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.


चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघात महालक्ष्मी महिला बचत गट आहे. या बचत गटात काम करणाऱ्या सर्व महिला या सर्वसामान्य घरातील आहे. चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने या महिला आता यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांनी या महिलांच्या पंखांना बळ द्यायचे म्हणून लोकसहभागातून त्यांना व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री पुरवली.


या यंत्र सामग्रीमुळे या महिलांना व्यवसायात यश मिळाले. या महिला आता स्वावलंबी झाल्या आहेत. यासाठी त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी, या चैतन्यमयी उत्सवात सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि शक्ती प्राप्त होवो ही आई जगदंबेचरणी प्रार्थना केली आहे.