गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील म्हसवे येथे आज (गुरुवार) पासून कडक लाँकडाउन केले आहे. तालुका प्रशासकीयच्या मिटींगमध्ये म्हसवे गावात येत्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढची येण्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार ही साखळी तोडण्यासाठी प्रशासकिय यंत्रणेने पाच दिवस म्हसवे गाव कडकडित बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे म्हसवे गावात २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोंबर पर्यंत सर्व व्यवहार अत्यावश्यक सेवा वगळता बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तर घराबाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक असून बिना मास्क आढळल्यास १०० रूपयांचा दंड सक्तीने वसूल करण्यात येणार आहे. तसेच कोणी ही नदीवर आंघोळीला, धुण्यासाठी तसेच जनावारांना पाणी पाजण्यासाठी बंदी केली आहे. तर गावातील सर्व मंदिरे पाच दिवस पूर्णपणे बंद असणार आहेत.

तर गावातील चौकात,गल्लीत अगर पारावरती कोणीही समूहाने बसायच नाही. म्हसवे गावातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वरील नियम पाळून प्रशासनाला मदत करावी, असे अवाहन कोरोना दक्षता कमेटीने केले आहे.