हवाई : एकीकडे संपूर्ण जगातच विध्वंस सुरु असताना आता यात भर टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. कारण, हवाईमध्ये असणारा जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी मौना लोआ पुन्हा सक्रिय झाला असून, त्याचा उद्रेक झाला आहे. या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे संपूर्ण आसमंतही लालसर रंगाचे झाले होते.

युनायटेट स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार मौना लोआच्या शिखरावर रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास स्फोट होण्यास सुरुवात झाली होती; परंतु सध्या या ज्वालामुखीच्या शिखरावर लाव्हारसाचे ओघळ वाहत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्यातरी या उद्रेकामुळे कोणाला इजा पोहोचली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या ज्वालामुखीचा उद्रेक ४ दशकांनंतर झालेला असून, यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.