मुंबई (प्रतिनिधी) : केरळच्या एर्नाकुलम येथील एका कन्वेंशन सेंटरमध्ये तीन मोठे स्फोट झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाले तेव्हा कन्वेंशन सेंटरमध्ये बैठक सुरु होती. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.


कन्वेंशन सेंटरमध्ये आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता. स्फोट कसा आणि कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. ज्यावेळी स्फोट झाला तेव्हा हॉलमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक लोक होते. पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.