कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरगुती कारणातून पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी सत्यजित भिकाजी जाधव (रा. शिवाजी पार्क, देवकर पानंद) याच्याविरोधात पत्नी शामल सत्यजित जाधव (वय २९, रा. देवकर पानंद) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवकर पानंद येथील शिवाजी पार्कमध्ये शामल जाधव राहतात. घरगुती कारणातून त्यांचे पती सत्यजित जाधव याने गेल्या एक वर्षापासून ते आजपर्यंत शामल जाधव यांना मारहाण करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्याच्या या त्रासाला कंटाळून शामल जाधव यांनी आज (रविवार) पती सत्यजित जाधव यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केली आहे.