कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयात सक्रीय कुष्ठरूग्ण शोध आणि नियमित सनियंत्रण अभियान १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी, लोकसहभागातून हे अभियान १०० टक्के यशस्वी करा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले, आशा, स्त्री स्वयंसेविका, पुरूष स्वयंसेवक, आरोग्य कर्मचाऱ्यांना अभियानासंबंधी प्रशिक्षण द्यावे. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक यांच्याशी चर्चा करून याबाबत सविस्तर माहिती घ्यावी. हे अभियान १०० टक्के यशस्वी करण्याच्या दृष्टीने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचाही सहभाग घ्यावा.

बैठकीत अवैद्यकीय पर्यवेक्षक संतोष नागपूरकर यांनी संगणकीय सादरीकरण केले.