कोल्हापूर ( प्रतिनिधी ) नंदगाव ता. करवीर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ढवण यांचे ( वय 55 ) आज पहाटे निधन झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ढवण यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ही वार्ता समजाताच नंदगाव पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपासून ढवण यांना ह्दयविकाराचा त्रास सुरु होता. मात्र काल दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी रात्री ह्दयविकाराचा त्रास अचानक वाढला. यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

यामुळे नंदगाव पंचक्रोशीवर शोककळा पसरली असून ढवण यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचे व्हिडीओ ही सोशल मिडीया चांगलाच व्हायरल झाले आहेत. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम गुरुवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे.