पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन

पुणे (प्रतिनिधी ) : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ रविवारी पुण्यातील कोकणवासियांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी चंद्रकांत पाटील, आमदार भरतशेठ गोगावले आणि उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे. माननीय मोदीजींचे विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांचे हात बळकट करणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्यच आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले