कोल्हापूर ( प्रतिनिधी ) पाचगाव शांतीनगर येथे पत्नीकडे पाहत असल्याच्या संशय घेत कोल्हापूर पोलिस कर्मचारी आशुतोष वसंत शिंदे याने कोयत्याचा वापर करत तक्रारदाराला मारहाण करत दहशत माजवली होती. या तक्रारीवरुन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज कारवाई करत शिंदे दाम्पत्याला निलंबित केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार विनोदकुमार गुणवंतराव वावरे (वय ४०) यांनी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दिनांक १६ आक्टोबर रोजी रात्री 9 च्या सुमारास मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल आशुतोष शिंदे आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली त्याची पत्नी रेश्मा हे दोघे किरकोळ कारणावरून कॉलनीतील लोकांशी नेहमी वाद घालत. यातच पत्नीकडे पाहत असल्याच्या संशयावरुन सोमवारी जोरदार राडा झाला.


आशुतोष शिंदे याचा सोमवारी रात्री विनोदकुमार वावरे यांच्याशी वाद घातला. कोयता नाचवत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेले फिर्यादी, त्यांची बहीण आणि दाजी यांना शिंदे दाम्पत्याने मारहाण केली. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यदीची दखल घेऊन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शनिवारी शिंदे दाम्पत्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.