कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्गावर (क्रमांक ४)  असणाऱ्या आप्पाचीवाडी फाट्याजवळ कार व मोटरसायकल अपघातात कोगनोळी येथील दोन युवक जखमी झाले. ही घटना आज (मंगळवार)  सकाळी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, निपाणी येथील शिक्षक आशिष नांगावकर हे नॅनो कार ( केए २४ एम ३३०२) घेऊन कागलला निघाले होते. येथील आप्पाचीवाडी फाट्याजवळ आले असता त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून समोर जात असणाऱ्या  स्प्लेंडर मोटरसायकलला ( एमएच ०९ डिक्यू ३९४७)  जोराची धडक दिली. या धडकेमध्ये स्वप्निल महादेव अक्कोळे व महावीर चिंचणे (रा. कोगनोळी) हे  गंभीर जखमी झाले. दोघांनाही कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर नॅनो कार धडक देऊन पलटी झाली.

घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरिक्षक एस. ए. टोलगी, पी. डी. घस्ती यांनी भेट देऊन पाहणी केली.