नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा आरोप कर्नाटक भाजपने नुकताच केला आहे. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी विधानसभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा आरोप तपासात खरा ठरला तर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

भारतीय जनता पक्षाने (भाजप) या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून बुधवारी बेळगावी, चित्रदुर्ग आणि मंड्यासह राज्यातील अनेक भागांत काँग्रेस सरकारचा निषेध करत निदर्शने केली. या आरोपाला उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले की, या प्रकरणात कोणालाही सोडण्याचा प्रश्नच येत नाही. या आरोपाचा संदर्भ देत ते म्हणाले, “हा केवळ भाजपचा आरोप नाही, तर हुसेन यांना विजयी घोषित केल्यानंतर विधानसभेत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या हा मीडियाचा आरोप आहे.

कठोर शिक्षा होईल – मुख्यमंत्री सिद्धरामय्या

फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (एफएसएल) अहवालात पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्याचे सिद्ध झाल्यास याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणाऱ्यांना संरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.सिद्धरामय्या म्हणाले की, आम्ही गोंगाटाचा अहवाल एफएसएलकडे पाठवला आहे.

कोणत्याही व्यक्तीने पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिल्याचे अहवालात खरे आढळून आल्यास त्याला कठोर शिक्षा केली जाईल.आरोपींना अटक न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिला.