नवी दिल्ली : Jio-Airtel-Vi ५ जी सर्व्हिसवरून गेल्या काही दिवसांपासून अनेक बातम्या समोर येत आहेत. आता भारतात ५ जी रोलआऊट पुढील महिन्यात केली जाणार आहे. दूरसंचार विभागने हे आधीच स्पष्ट केले आहे. पहिल्या टप्प्यात या सर्व्हिसला देशातील १३ शहरांत लाँच केले जाणार आहे. आता कोणत्या शहरात ५ जी सर्व्हिसला पहिल्या टप्प्यात आणले जाणार आहे.

५ जी सर्वात आधी देशातील प्रमुख शहरांत सुरू केली जाणार आहे. या यादीत अहमदाबाद, बेंगळुरू, चंडीगढ़, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. हे इंडिया मोबाइल कॉग्रेस (आयएमसी) २०२२ च्या ओपनिंग समारंभात लाँच केली जाणार आहे. भारतात पुढील महिन्यात या सर्व्हिसला लाँच केले जाणार आहे.