कळे (प्रतिनिधी) : बाजार भोगांव (ता.पन्हाळा) येथील सराफी दुकानातून दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून दोन अनोळखी व्यक्तींनी ८५ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद अवधूत रामचंद्र जाधव सध्या (रा. बाजार भोगांव) यांनी कळे पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजार भोगांव येथे अवधूत जाधव यांचे अमृता ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात अंदाजे ५५ ते ५८ वर्षे वयोगटातील, उंची अंदाजे ६ फूट, रंगाने निमगोऱ्या असणाऱ्या दोन अनोळखी व्यक्ती दागिने खरेदी करण्याच्या बहणा करून आल्या.

त्यांनी काऊंटरच्या कप्यातील बॉक्समधील गंठणचे सोन्याचे पेंडल, मनिमंगळसूत्र, सोन्याच्या कानातील डिझाईनच्या रिंगा असा एकुण ८५ हजारांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणाचा अधिक तपास कळे पोलिस करीत आहेत.