नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ‘पैसे घेताना प्रश्न विचारल्या’ प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची शुक्रवारी लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोईत्रा यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मांडला, त्याला सभागृहाने आवाजी मतदानाने मंजुरी दिली.

मोइत्रा यांच्या हकालपट्टीवर लोकसभेत चर्चेदरम्यान जेडीयूचे खासदार गिरिधारी यादव म्हणाले की, ते स्वतःचे प्रश्न कधीच लिहित नाहीत कारण त्यांना संगणक कसे चालवायचे हे देखील माहित नाही. त्यांनी सांगितले की त्यांचा संसद लॉगिन आयडी त्यांच्या पीएकडे आहे. गिरधारी यादव म्हणाले, “मला माझा पासवर्डही आठवत नाही. तो माझ्या PA कडेच राहतो.

यावेळी मी भीतीपोटी एकही प्रश्न विचारला नाही. काय होईल हे मला माहीत नाही. दुसरा कोणीतरी माझा प्रश्न विचारायचा. मी कधीही “मी माझे स्वतःचे प्रश्न तयार करत नाही. बरेच खासदार स्वतःचे प्रश्न तयार करत नाहीत. असे काही फार हुशार लोक असतील ज्यांनी 2 तासांत अहवाल वाचला असेल.”

महुआच्या समर्थनार्थ बोलताना ते पुढे म्हणाले की, “आम्हाला कळतही नाही. कॉम्प्युटर चालवायचा हेही कळत नाही. आम्ही तिसऱ्यांदा खासदार झालो, चार वेळा आमदार झालो. यातून शिकता येईल का ? म्हातारपणी ? लालू यादव ते म्हणायचे, म्हातारी गाय कोणती पोज मागते ? आता या वयात ते शक्य नाही. मी अजिबात प्रश्न विचारला नाही. असा ही सवाल त्यांनी यावेळी केला.