पंढरपूर (प्रतिनिधी) ; महाराष्ट्राचेच नव्हे तर संपुर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरातील विठ्ठल मंदीर देवस्थानात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेने केली आहे. तसेच मंदीरातील विविध प्रकरणांची ही निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दान करण्यात आलेल्या दागिन्यांच्या साठ्यामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. ही बाब अत्यंत संतापजनक असून भाविकभक्तांनी श्रध्देपोटी धन दान करतात. परंतु, त्याने अर्पण केलेली वस्तु जर मंदिराच्या कार्यासाठी उपयोगी न पडता ती वस्तु गहाळ होणे अथवा चोरी होणे म्हणजे त्या भाविकाच्या श्रध्देचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

तसेच उपजिल्हाप्रमुख आकाश माने म्हणाले की, मंदिर समितीकडुन भाडेतत्त्वावर निरूपयोगी अशा जागेपोटी रेल्वे प्रशासनाला कशासाठी दिले जात आहेत. मंदिर समितीच्या निविदा प्रक्रिया देखील विशिष्ट लोकांच्या संगनमताने होतात अशा चर्चा आहेत, हे सर्व प्रश्न आमच्याच मनात नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम भाविकांच्या मनात निश्चीत आहेत,

तसेच या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून तात्काळ कारवाई करावी अन्यथा पुढील काळात उग्र स्वरूपाची आंदोलने करून पांडुरंगांच्या भाविकांच्या श्रध्देचा सन्मान करू असा इशारा युवासेनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी युवासेनेचे तालुकाप्रमुख योगेश भैय्या चव्हाण,जिल्हासमन्वयक फिरोज तांबोळी,सांगोला युवासेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले,सांगोला तालुका समन्वयक शंकर मेटकरी,युवासेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर, विशाल डोंगरे,विठ्ठल काळे आदि.उपस्थित होते.