कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दूध खरेदी दरामध्‍ये दि. २१ ऑगस्टपासून संघाने सरासरी प्रतिलिटर १ रुपये वाढ केलेली आहे.

दि. २५ ऑगस्टच्‍या संचालक मंडळाच्‍या बैठकीमध्‍ये हा निर्णय घेण्‍यात आला आहे, अशी माहिती संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी दिली. गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर ३१ रुपये असा दर राहणार आहे. गाय दूध खरेदी दरात चार वेळा वाढ करून दूध उत्पादक शेतकऱ्याना दिलासा देण्याचे काम केले आहे, असे ते म्हणाले. सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना पाठवण्यात येणार आहे.