मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ रविवारी मनसेच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन

पुणे (प्रतिनिधी ) : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ रविवारी पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार मेळावा संपन्न झाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, माननीय राजसाहेब ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिल्याने महायुतीची ताकद अधिक वाढली आहे. राजसाहेबांसोबत माझे विद्यार्थी परिषदेच्या कामापासून ऋणानुबंध, त्यांचे आणि आमचे संबंध जिव्हाळ्याचे असल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान, भारतीय जनता पक्ष हा सर्वांचा नेहमीच सन्मान करणारा पक्ष असल्याने आगामी काळातही मनसेसोबतची ही युती कायम असेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

मोदीजींच्या महाविजय संकल्प सभेला अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन याप्रसंगी केले. यावेळी मनसेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.