नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) संयुक्त राष्ट्राने भारतासाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. यानुसार गेल्या 18 वर्षांत भारतातील गरिबीची पातळीवर काहीशी कमी होते 41.50 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला भारतात संपत्तीमध्ये प्रचंड असमानता असल्याचं ही म्हटलं आहे.

संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकांकडे देशाच्या निम्म्याहून अधिक संपत्ती आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, उच्च उत्पन्न आणि संपत्ती असमानता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. अहवालानुसार, 2005 पासून, भारताने अंदाजे 415 दशलक्ष (41.5 कोटी) लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.

भारतातील दरडोई उत्पन्न 2000 ते 2022 दरम्यान US$442 वरून US$2,389 पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, 2004 आणि 2019 दरम्यान, दारिद्र्य दर (दररोज US $ 2.15 या आंतरराष्ट्रीय मानकावर आधारित) 40 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आला. या अहवालानुसार, सर्वाधिक उत्पन्न असमानता असलेले देश मालदीव, भारत, थायलंड आणि इराण आहेत.