कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील चोवीस तासांत २०६३ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १,०३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकूण १९ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ५७५ तर करवीर तालुक्यात ३८० रुग्ण आढळून आले आहेत. गगनबावडा तालुक्यात मात्र एकही रुग्ण आढळून आला नाही.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ५७५, आजरा- ८२, भुदरगड- ४८, चंदगड- १५, गडहिंग्लज- ६७, गगनबावडा- ०, हातकणंगले – २२१, कागल- ९५,  करवीर- ३८०, पन्हाळा- १००, राधानगरी- ९७, शाहूवाडी- ३५, शिरोळ- १३४, नगरपरिषद क्षेत्र- १९८, इतर जिल्हा व राज्यातील- १६ अशा २०६३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ५७, ८२१ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ३९, ७२४  

मृतांची संख्या – ४, ७४८

उपचार सुरू असलेले रुग्ण – १३, ३४९