पंढरपूर (प्रतिनिधी) :  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून कायमच नवनवीन उपक्रम राबवत असतात. यावेळी पंढरपूरमध्ये पहिल्यांदाच शिवमहापुराण कथेचे अयोजन चंद्रभागा मैदान डीव्हीपी स्क्वेअर समोर २५ ते ३१ डिसेंबर पर्यंत सिहोरचे पंडित प्रदीप मिश्रा यांचे कथेचे आयोजन पाटील यांनी केले आहे.

पंढरपूरमध्ये भाविकांच्या सोयीसाठी जवळपास चार एकरामध्ये मंडपाची सोय केलेली आहे. तर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सेवा, मदत केंद्रांची उभारणी केलेली आहे. या कथेमुळे पंढरपूरला वारीचे स्वरूप दिसून आलेले आहे. १८ पुराणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे असलेले पुराण म्हणजे शिवमहापुराण. पंढरपूर मध्ये या कथेचे आयोजन ही भाविकांसाठी अत्यंत पावन अशी पर्वणी ठरणार आहे.

तर पंढरपूर आणि परिसरातील सुमारे १० लाख भाविक या कथेचा लाभ घेण्यासाठी येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे.