कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १,४४९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. आज (सोमवार) दिवसभरात २,०८७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ५,९५३ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३९७, आजरा तालुक्यातील ४७, भुदरगड तालुक्यातील ३४, चंदगड तालुक्यातील ३१, गडहिंग्लज तालुक्यातील ४२, गगनबावडा तालुक्यातील ८, हातकणंगले तालुक्यातील १४८, कागल तालुक्यातील ३५, करवीर तालुक्यातील ३२५, पन्हाळा तालुक्यातील ११४, राधानगरी तालुक्यातील २४,  शाहूवाडी तालुक्यातील ४२, शिरोळ तालुक्यातील ६६, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १०० आणि इतर जिल्ह्यातील ३६ अशा १,४४९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – १,२३,८२१.

डिस्चार्ज – १०,६,३३३.

उपचारासाठी दाखल रुग्ण – १३,५३४.

मृत्यू – ३,९५४.