बारामती – सध्या लोकसभा निवडणुकीचं रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहे. या प्रचारादरम्यान नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना देखील पाहायला मिळत आहे. अशातच या प्रचारादरम्यान पवार कुटुंबियांमध्ये कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेला बारामती मंतदार संघ सर्वाधिक चर्चेचा विषय बनलेला आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदार संघातून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे नणंद भावजय मध्ये लढत पाहायला मिळनार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी कृषिमंत्री शरद पवार जोरदार प्रचार करत आहेत. अशातच अजित पवारांचे एक वक्त्यव्य जोरदार चर्चेत आहे. तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिला तर तुम्हाला माझा फायदा होणार आहे. मी तुमचा पालकमंत्री आहे. उद्या बायको म्हणाली हे काम करून दे तर मला करावे लागणार आहे . असे गमतीशीर वक्त्यव्य त्यांनी केले आहे. अजित पवार हे काल रात्री खडकवासला विधानसभा मतदारसंघात बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नागरिकांच्या आणि युतीच्या कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत होते. त्यावेळी ते बोलत होते

काय म्हणाले अजित पवार..?

अजित पवार म्हणाले, या गावाची ८० टक्के जागा एनडीएसाठी घेतली आहे. हे बंधन आणि तोडगा काढायचा आहे. हे केव्हा निघेल संरक्षण मंत्र्याचा विचाराचा खासदार ज्यावेळेस जाईल तेव्हा मिळेल म्हणून आम्ही म्हणतोय घड्याळाला मतदान करा म्हणजे आपोआप होईल. तुम्ही निवडून दिलेल्या विरोधी पक्षाच्या खासदाराच तिथं चाललंच नाही. आता त्यांनी त्यांना सोडलं आम्हाला सोडून गेले आम्ही आमचा पक्ष ठेवला, असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला.
अजित पवार पुढे असेही म्हणाले की, माझा तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर मी तुमचा पालकमंत्री आहे. पुणे पालिका, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए जिल्हा परिषद, राज्य सरकार निधी आहे, माझी पणं जबाबदारी वाढणार आहे. उद्या बायको घरी म्हणाली, हे काम करुन दे तर मला करुन द्यावेच लागणार आहे, नाहीतर माझ काही खरं नाही, असे म्हणत त्यांनी मिश्कील भाष्य त्यांनी केले.