नाशिक (प्रतिनिधी) : कोल्हापूरमधून निवडून येणार होतात, तर कोथरूड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा अधिकार का डावलला? असा खोचक प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ छगन भुजबळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचलं. कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे चॅलेंज चंद्रकांत पाटलांनी दिले होते. त्यावर भुजबळ यांनी त्यांना टोला लगावला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्यपाल महोदय यांच्या उपस्थितीत येत्या दोन वर्षांत सर्व इमारती पूर्ण व्हाव्यात, अशी कोपरखळी भुजबळांनी मारली. त्याला लागलीच राज्यपालांनीही उत्तर दिले. तब तक क्या सीन रहेगा? या कोश्यारींच्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले “हम तब भी आपके साथ ही रहेंगे” या दोघांच्या जुगलबंदीने व्यासपीठावर एकच हशा पिकला.