कोल्हापूर (प्रतिनिधी ) : सगळ काय मीच केले म्हणवून घेण्याची सवय कॉंग्रेस नेत्याला लागली आहे. त्यांचा मी पणा इतका वाढला आहे कि भर सभेत ते मतदारांना बघून घेण्याची भाषा करत आहेत. महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना वाढता प्रतिसाद पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, ते आगामी ध्येयधोरणे सोडून व्यक्तिगत टीकेवर भर देवून मतदारांची दिशाभूल करत आहेत. कसबा बावड्याच्या विकासासाठी शिवसेनेने नेहमीच प्राधान्य दिले आहे. पण, आमच्याकडून विकास कामे होतात म्हंटल्यावर त्यात आडकाठी घालण्याचे काम कॉंग्रेसच्या नेत्याकडून केले जाते. आम्ही पण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक आहोत पुढील काळात कसबा बावड्याच्या विकास कामांच्या आडवे याल तर याद राखा, असा सज्जड इशारा देत कसबा बावड्याच्या सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.

महायुतीचे शिवसेना उमेदवार खास.प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ जय भवानी चौक, कसबा बावडा येथे कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाषणाच्या सुरवातील राजेश क्षीरसागर यांनी कसबा बावड्यातील दिगवंत शिवसैनिकांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, कसबा बावडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे २०१९ ची निवडणूक वगळता गेल्या सर्वच निवडणुकीत बावडावासियांनी शिवसेनेला साथ दिली आहे. हिंदुत्ववादी कसबा बावडा पुरोगामी करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस नेत्यांकडून होऊ लागला आहे. परंतु, कट्टर हिंदुत्वाची ज्योत कसबा बावडा वासीय सदैव तेवत ठेवतील. कसबा बावड्याच्या विकासाला शिवसेनेने नेहमी प्राधान्य दिले आहे. राजाराम बंधाऱ्याचा नवीन पुल आपल्या माध्यमातून मंजूर झाला. पण, त्याचे श्रेय घेता येत नाही म्हणून ते काम बंद पाडण्यासाठी काड्या लावण्याचे काम काहींनी केले. पण, आगामी काळात हा पूल पूर्णत्वास आणून अशा खुनशी राजकारणास चपराक देणार आहे. कसबा बावड्यातील मुलभूत सोई सुविधांना निधी, ओपन जिम, दलित वस्ती सुधारणा यासह कसबा बावड्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी खांबावर तिरंगा कलरची विद्युत रोषणाई हे शिवसेनेचे काम आहे. यावर न थांबता कसबा बावड्याच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासह महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन केले

.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक सुनील जाधव, प्रदीप उलपे, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख अमोल माने, किशोर घाटगे, शिवसेना वैद्यकीय कक्ष शहर संघटक कृष्णा लोंढे, किसन खोत, पांडुरंग लोंढे, सचिन पोवार, रोहन उलपे, आदर्श जाधव, सचिन पाटील, राजू काझी, कपिल पोवार, सुरज सुतार , धवल मोहिते यांच्यासह भागातील नागरिक, महिला, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते