कोल्हापूर (प्रतिनिधी) : विजयादशमी, दसऱ्याचे औचित्य साधून पालकमंत्री सतेज पाटील यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना नवीन राजवाड्यात जाऊन शुभेच्छा देत त्यांचे आशिर्वाद घेतले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कोल्हापुरातील छत्रपती चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने दसरा चौकात साजरा करण्यात येणारा ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. ऐतिहासिक सोहळा रद्द झाल्याने पालकमंत्री पाटील यांनी रविवारी दसऱ्याच्या पावन संध्येला नवीन राजवाड्यात जाऊन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती व परिवाराला विजयादशमी, दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी पालकमंत्री यांना आशीर्वाद दिले.