मुंबई – गेल्या काही महिन्यापासून मुंबईमध्ये मराठी व गुजराती वाद चांगलाच वाढत चाललाय. दोन दिवसापूर्वी गिरगावात मराठी मुलांनी मुलाखतीसाठी येऊ नये असे सांगणारे जाहिरात एका तरुणीने दिली होती. त्यानंतर प्रकरण तापलेलं पाहून तरुणी माफी मागितली . त्यानंतर दोन दिवसापूर्वी ठाकरे गटाच्या मराठी पदाधिकाऱ्यांना गुजराती रहिवासी राहत असलेल्या सोसायटीमध्ये प्रचार करण्यास थांबवण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटानं केला होता . त्यामुळे मुंबईमध्ये मराठी व गुजराती प्रकरण दिवसेंदिवस बिघडत चाललं असल्याचा पाहायला मिळत आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी यावर आता भाजपवर निशाणा साधलाय. मुंबईत गुजरातची मस्ती भाजपमुळे वाढत चालले असा आरोप आदित्य ठाकरे यांनी भाजपवर लगावला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे..?

आदित्य ठाकरे म्हणाले मुंबईत गुजरातींची मस्ती भाजपमुळं वाढली, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. मराठी माणसांना गुजराती सोसायट्यांमध्ये प्रचारासाठी मनाई केली जाते… भाजपमुळं ही मस्ती वाढलीय, असं त्यांनी सांगितलं. भाजपचं सरकार डोक्यावर बसल्यास घरोघरी सीसीटीव्ही लावतील. मटण खायचं की भाजी तेच सांगतील, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. भाजपला स्वातंत्र्य हिरावून घ्यायचंय आणि भारताचा चीन करायचाय, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. एका मुलाखतीत त्यांनी भाजपवर हा निशाणा साधला आहे.

पुढे आदित्य म्हणाले, तुम्ही ज्या राज्यात आहात त्या राज्याचा विचार करणार नाही का? भाजप संविधान बदलू इच्छितोय, भाजपला लोकशाही संपवायची आहे, भाजपाला मित्रपक्ष नकोत, भाजपाला मुंबई तोडायची आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. आता यावर भाजप नेते काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लागून राहिलं आहे.