मुंबई – एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीचं वारं सर्वत्र वाहत आहे . तर दुसरीकडे मनसे महायुतीत येणार असल्याच्या चर्चेनी जोर धरला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यानंतर या चेर्चेना वेग आला आहे तरीही मनसे महायुतीत येणार की नाही याच्यावर अद्याप ही सस्पेन्स कायम आहे. कारण अजूनही राज ठाकरे ना महायुतीकडून या गोष्टीवर अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला आपल्या मनसैनिकांसाठी जाहीर मिळावा आयोजित केला आहे . या जाहीर मेळाव्यात मनसे महायुतीत येणार की नाही याचं उत्तर मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि राज ठाकरेंची भेट

अशातच या मेळाव्याच्या आदीच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरेंचचे निवासस्थान शिवतीर्थावर ही भेट झाली असून, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत राजकीय चर्चा झाली असून, युतीबाबत देखील चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, राज ठाकरेंच्या भेटीत कोणतेही राजकीय चर्चा झाली नसल्याचं शिरसाट म्हणाले. शिरसाट माध्यमांशी संवाद साधत होते त्यावेळी ते बोलत होते

राज ठाकरे महायुतीत येणार की नाही काय म्हणाले संजय शिरसाट..?

महायुतीतील एक प्रमुख नेते आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मनसेसोबतच्या युतीवर विधान करून चर्चांना तोंड फोडले आहे. राज ठाकरे हे वरिष्ठ नेते आहेत. ते महायुतीत येणार की नाही याबाबत बोलण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. मात्र ते आले तर त्यांचे स्वागतच होईल. रेड कार्पेटवर त्यांचे स्वागत केले जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांची सभा आहे आणि या सभेच्या दिवशी राज ठाकरे महत्त्वाची घोषणा करू शकतात, असं संजय शिरसाट यावेळी म्हणाले.