कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते त्यांचा महालक्ष्मीची प्रतिमा, श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, डेव्हलपमेंट बोर्डाच्या सहसचिव श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीर प्रांतधिकारी वैभव नावडकर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आदी उपस्थित होते.