कोल्हापूर, (प्रतिनिधी ) – कोल्हापुरात महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त उपस्थित वीरपत्नी, अधिकारी, नागरीक व जनतेला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संचलन करण्यात आले. पोलीस बँड पथकाच्या निनादात पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांना सलामी देण्यात आली. यामध्ये पोलीस विभागाचे पथक, वन विभागाचे पथक, ॲम्बुलन्स पथक, तसेच बॉम्बशोधक पथकाचा समावेश होता.

यावेळी माजी सैनिकांच्या वीरपत्नी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तकेयन एस. या प्रमुख अधिकाऱ्यांसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्यगीत आणि राष्ट्रगीतांचे गायन झाले.