नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल आता कस्टमर अकौंटसाठी नवीन धोरण अमलात आणणार आहे. त्यानुसार ज्यांचे जीमेल अकौंट दोन वर्षे निष्क्रिय असेल ते बंद करण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी १ जून २०२१ पासून होणार आहे. अर्थात याबाबत पूर्वसूचना दिली जाईल असून गुगलने हे धोरण अमलात आणण्यासाठी तयारी केली आहे.

दोन वर्षांपासून एखाद्याचे जीमेल (Gmail), ड्राइव्ह (Google Drive), गुगल फोटो (Google Photo) निष्क्रिय असेल तर कंपनी आपल्या कंटेन्टमधून काढून टाकू शकते. जी निष्क्रिय आहेत, त्यांना कंपनी बाहेरचा रस्ता दाखवू शकणार आहे. याबाबत कंपनीने स्पष्ट केले की, नवीन धोरण अमलात आणण्यात येत आहे. जर आपले खाते त्याची स्टोरेज मर्यादा दोन वर्षांपेक्षा जास्त असेल तर आपली सामग्री जीमेल, ड्राइव्ह आणि फोटोंमधून काढू शकेल. ती सामग्री काढून टाकण्याआधी जीमेल वापरकर्त्यांना याची कल्पना अनेक वेळा दिली जाईल, याबाबत माहिती देण्यात येईल.

मात्र, आपले खाते सक्रिय ठेवण्याचा सोपा उपाय म्हणजे आपण जेव्हा साइन इन करू किंवा इंटरनेटवर काम करताना वेळोवेळी आपल्या जी-मेल, ड्राइव्ह किंवा फोटोला भेट देणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, निष्क्रिय खाते व्यवस्थापक आपली विशेष सामग्री वाचविण्यासाठी मदत करू शकेल.