पणजी (वृत्तसंस्था) : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे खंडणीची मागणी करून त्यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री सावंत यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये त्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमक्या देण्यात येत आहेत. या प्रकरणी पणजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

१ नोव्हेंबर पासून मुख्यमंत्री सावंत यांना मोबाइलवर अज्ञातांकडून धमकीचा  मेसेज येत आहे. यात तो  खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी देत होता. हा प्रकार ३-४ दिवस सुरु होता. अखेर याची गंभीर दखल घेत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.  मुख्यमंत्री सावंत यांचे खासगी सचिव आत्माराम बर्वे यांनी  पणजी पोलीस ठाण्याला मेल पाठवून याबाबत तक्रार दिली आहे.   अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.