टोप (प्रतिनिधी) : गणेशोत्सवनिमित्त येथील ग्रा.पं. च्या वतीने आयोजित आकर्षक देखावा स्पर्धेमध्ये गणेश तालीम व हनुमान तालीम मंडळ यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला.

या देखावा स्पर्धेमध्ये १० मंडळांनी भाग घेतला होता. यासाठी गावाबाहेरील परीक्षक ग्रा.पं. ने नेमले होते. आज ग्रा.पं. च्या देखावा स्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले. यामधील अन्य विजेते : व्दितीय- भगतसिंग ग्रुप, तृतीय- एकसंघ ग्रुप, चतुर्थ- ज्वाला ग्रुप, पाचवा- कल्लेश्वर ग्रुप. उद्योजक पार्टी प्रमुख तानाजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

यानंतर विविध विषयात उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल अनेक मंडळांचा सत्कार करण्यात आला. पारितोषिक मिळालेल्या मंडळांनी फटाक्यांची आतषबाजी करत गाड्याची रॅली काढली. कार्यक्रमास सरपंच रूपाली तावडे, उपसरपंच विश्वास कुरणे, राजू कोळी, संग्राम लोहार, अशोक पाटील, पांडुरंग पाटील, प्रमुख पदाधिकारी तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.