कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील शिवाजी विद्यापीठच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी केअर सेंटरमध्ये अनेक दिवसांपासून दोन व्हेंटीलेटर वापराविना पडून आहेत. कोरोना रूग्णांना ऑक्जिजनची गरज असतना व्हेंटीलेटर पडून असल्याने आरोग्य प्रशासनाचा गलथानपणा उघड झाला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सेंटरमध्ये घुसून हा प्रकार समोर आणला. 

शहर आणि जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या लक्षणीय आहे. ऑक्सिजनचे बेड मिळवताना कोरानाबाधित रूग्णांची धावाधाव होत आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठच्या सेंटरमध्ये ऑक्सिजनचे व्हेंटीलेटर धूळखात पडून असल्याने संभाजी ब्रिग्रेडचे जिल्हा अध्यक्ष रूपेश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी समोर आणले. या गलथानपणास जबाबदार असणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

पदाधिकाऱ्यांनी संबंधीत अधिकाऱ्यास धारेवरही धरले. त्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याशी संपर्क साधून दोन व्हेंटीलेटर तीन महिन्यांपासून येथे पडून का आहेत ? अशी विचारणा केली. यावर त्यांनी व्हेंटीलेटर आयसोलेशन हॉस्पिटल येथे वापरणार असल्याचे सांगितले. दरम्यान, त्या व्हेंटीलेटर प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी

यावेळी शहराध्यक्ष अभिजीत भोसले, निलेश सुतार, विकी जाधव, राहुल पाटील, संतोष पाटील, सचिन चौगुले, राकेश जाधव, अविनाश आंबी, संजय रणखांब यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.