यड्राव (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील यड्राव गावामध्ये उद्या (मंगळवार) पासून आठ दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता कमिटीने घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला.

दूध डेअरी, किराणा, बेकरी सात ते नऊ या वेळेमध्ये सुरू असणार आहेत. या नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या नागरिकांच्यावर कठोर कारवाई करण्यात असल्याची माहिती सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली. विनामास्क दिसल्यास पाचशे रुपये आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय सुरू ठेवल्यास पाच हजारांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आता पर्यंत एकूण १७१ रुग्ण बाधित झाले होते. त्यामध्ये १२४ रुग्ण बरे होऊन परतले आहेत . तर १० रुग्ण मयत आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे ही या वेळी सरपंच कुणालसिंह यांनी सांगितले.