कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. हॉस्पिटलमध्ये कॉक्लेअर इप्लांट ऑपरेशन झालेल्या मुलांचा मेळावा यानिमित आयोजित करण्यात आला होता. या मुलांचे बोलणे ऐकून उपस्थित पालक आणि डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

दरवर्षी 3 मार्च हा दिवस ‘जागतिक श्रवण दिन’ म्हणून साजरा केला जातो. कर्णबधिरते संबंधीचे गैरसमज दूर करणे, त्याचबरोबर निदान व उपचार पद्धतीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे व त्याचा लाभ त्यांना मिळवून देणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. मुलांमधील कर्णबधिरता दूर करण्यासाठी कॉक्लेअर इप्लांट हा प्रभावी उपाय आहे. डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटलच्यावतीने आजपर्यंत १४ मुलांवर कॉक्लेअर इप्लांट ऑपरेशन करण्यात आले आहे. या मुलांचा मेळावा यानिमित्त आयोजित करण्यात आला होता.

कॉक्लेअर इप्लांट झालेल्या मुलांच्या पालकांनी डी वाय पाटील हॉस्पिटलकडून होत असलेली तपासणी, उपचार व झालेल्या मोफत ऑपरेशनबद्दल यावेळी समाधान व्यक्त केले. आपली मुले उपचारानंतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे नेहमीच्या शाळेत जात आहेत. आमच्याशी संवाद साधत आहे याचा मोठा आनंद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ऑपरेशन झालेल्या मुलांनी गाणी म्हणणे अंक मोजणे,पालकांशी संवाद साधणे इत्यादी श्रवण आणि वाचा संदर्भातील प्रगती सर्वांसमोर सादर केली.

या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील,विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल , रजिस्ट्रार डॉ. विश्वनाथ भोसले यांचे सहकार्य लाभले.

यावेळी जिल्हा आरोग्य आरोग्यधिकारी डॉ. राजेश गायकवाड, सिव्हिल सर्जन डॉक्टर सुप्रिया देशमुख, सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलिमा पाटील, आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. नितीन घोरपडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ. फारूक देसाई, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा आदी उपस्थित होते.