मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून आज (गुरूवारी) डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ताप येत असल्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अमित यांच्या तातडीने काही चाचण्यात केल्या गेल्या होत्या. त्यामध्ये कोरोना चाचणीचाही समावेश होता. त्यांचा कोरोना आजाराचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. मलेरिया आणि इतर चाचण्याही निगेटिव्ह आल्या होत्या. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ताप व्हायरल असण्याची शक्यता आहे. त्यांची प्रकृती चांगली झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.