कोल्हापूर (प्रतिनिधी) : बनावट सोशल मिडिया अकाऊंट काढून पत्नीचे अश्लील छायाचित्र आणि संदेश टाकून पतीने बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीवर करवीर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,  करवीर तालुक्यातील शहराशेजारी असणाऱ्या गावात पती-पत्नी राहत होते. काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद झाला. त्यामुळे दोघेही एकमेकांपासून वेगळे राहतात. पत्नीला त्रास देण्याच्या उद्देशाने पतीने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट काढून पत्नीच्या आई व बहिणीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तसेच पत्नीचे अश्लील छायाचित्र आणि संदेश बनावट इंस्टाग्राम अकाऊंट वरून अनेकांना पाठवले. याप्रकरणी पतीवर करवीर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.