साळवण (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागातर्फे भात पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात जिल्ह्यातील १६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये गगनबावडा तालुक्यातील असंडोली येथील दामाजी बाळकृष्ण पाटील यांचा भात पिकामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. तर दुसरा क्रमांक शंकर गणपत पाटील (रा. सडोली खा.), तिसरा क्रमांक वसंत कुंभार (रा. वाळवेकर वाडी ता. पन्हाळा) चौथा क्रमांक पांडुरंग कुंभार तर पांडुरंग कोल्हे यांचा पाचवा क्रमांक आला आहे.
सर्व शेतकऱ्यांना पंचायत समितीचे कृषी अधिकारी मोहनदास दाभाडे व विस्तार अधिकारी शिवाजी गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले .